प्रतिनिधी/ सांगली
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज गुरवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 28.11 टी.एम.सी. पाणीसाठा झाला धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी.आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 66.76 (105.25), धोम 8.18 (13.50), कन्हेर 6.26 (10.10), दूधगंगा 14.20 (25.40), राधानगरी 5.51 (8.36), तुळशी 2.22 (3.47), कासारी 2.10 (2.77), पाटगांव 2.76 (3.72), धोम बलकवडी 3.04 (4.08), उरमोडी 6.36 (9.97), तारळी 4.68 (5.85), अलमट्टी 95.06 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 1125, दुधगंगा 100, राधानगरी 1425, कासारी 5500, उरमोडी 300 व अलमट्टी 65 हजार 328 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी नद्यांची पाण्याची गुरवार दुपारची पाणीपातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 19.0 (45), आयर्विन पूल सांगली 13.6 (40) व अंकली पूल हरिपूर 16.9 (45.11).
Previous Articleमुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे राजीनाम्याचे संकेत
Next Article पूरस्थितीतील भागात ‘आपत्ती व्यवस्थापन’ पथके दाखल







