प्रतिनिधी / विटा
सांगली जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. 21 डिसेंबर ला मतदान तर 22 रोजी मतमोजणी होणार आहे.
29 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. निवडणुकीसाठी 1 ते 7 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 8 डिसेंबर छाननी होईल तर 21 डिसेंबर ला मतदान होणार आहे. 22 डिसेंबर ला मतमोजणी होईल, असा निवडणूक कार्यक्रम आयोगाने निश्चित केला आहे.