गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या यंत्रणांना सूचना
प्रतिनिधी / सांगली
वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून त्यानंतर कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेताना आवश्यक अशा या सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना तसेच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बरोबरच आयर्विन पूल दुचाकीसाठी सुरू करण्यासाठीच्या सूचनाही पालकमंत्री पाटील त्यांनी केल्या.








