जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 66 वाढलेः ग्रामीण भागात 222 वाढलेः उपचारात अवघे 3835 रूग्ण
प्रतिनिधी / सांगली
मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 288 रूग्ण वाढले. तर 492 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 538 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार 835 रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत.
महापालिका क्षेत्रात 66 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन 66 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 55 तर मिरज शहरात 11 रूग्ण वाढले आहेत. मनपा क्षेत्रात रूग्ण वाढीचे प्रमाण आता कमी झाले आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 549 रूग्ण झाले आहेत. त्यातील 86 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 222 रूग्ण वाढले
जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातही आता रूग्ण संख्या हळूहळू घटू लागली आहे. मंगळवारी नवीन 222 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 14 तर जत तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 35 रूग्ण कवठेमहांकाळ तालुक्यात 16 तर खानापूर तालुक्यात 34 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. मिरज तालुक्यात 31 रूग्ण तर पलूस तालुक्यात 16 रूग्ण शिराळा तालुक्यात 21 रूग्ण वाढले. तासगाव तालुक्यात 20 तर वाळवा तालुक्यात 29 रूग्ण वाढले आहेत. असे ग्रामीण भागात एकूण 222 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील एक, कवठेमहांकाळ तालुक्यातील एक तर खानापूर तालुक्यातील चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यातील एकाचा आणि वाळवा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर मिरज शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 538 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्यू दर 3.68 इतका झाला आहे.
परजिल्ह्यातील नवीन सहा रूग्ण वाढले
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. मंगळवारी परजिल्ह्यातील सहा नवीन रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील चार, सोलापूर जिल्ह्यातील एक आणि मुंबई येथील एकाचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात परजिल्ह्यातील एक हजार 288 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये एक हजार 37 रूग्ण बरे झाले आहेत. तर 53 रूग्ण उपचारात आहेत. मंगळवारी उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आणि सातारा जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील 198 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोन हजार 953 स्वॅब तपासले
जिल्ह्यात मंगळवारी दोन हजार 953 स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये आरटीपीसीमधून 673 रूग्णांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजनमधून दोन हजार 280 जणांचे स्वॅब तपासले आहेत यामध्ये 288 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
36 हजार 384 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात मंगळवारी 492 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजअखेर जिल्ह्यातील 36 हजार 384 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87 टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात उपचारातील रूग्णसंख्या आता घटू लागली आहे. जिल्ह्यात सध्या उपचारात अवघे तीन हजार 835 रूग्ण आहेत.
नवीन रूग्ण 288
उपचारात रूग्ण 3835
बरे झालेले 36384
एकूण रूग्ण 41757
एकूण मृत्यू 1538








