कोअर कमितीमध्ये निर्णय; बिनविरोधचा प्रस्ताव नाही
सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागा भाजपा स्वबळावर लढविणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये हा निर्णय झाला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे. इच्छुकांनी सोमवार पर्यंत पक्षाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
देशमुख म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपा कोअर कमिटीची बैठक झाली. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार शिवजीराव नाईक, विलासराव जगताप, दिनकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, निताताई केळकर, मकरंद देशपांडे, रमेश शेंडगे, सुरेश आवटी, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्व नेत्यांनी एकमताने घेतला आहे.
त्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सर्वच्या सर्व २१ जागांवर भाजपाचे उमेदवार उभा केले जातील असे सांगत देशमुख म्हणाले, भाजपाची प्रत्येक तालुक्यात चांगली ताकद आहे. सर्व जागांचा अभ्यासही करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव सद्या तरी भाजपा कडे आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव आल्यास कोअर कमितीमध्ये निर्णय घेतला जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








