प्रतिनिधी / सांगली
जिल्हा परिषदेच्या हिताविरोधात सदस्यांनी बेकायदेशीर नियमबाह्य आणि घटनेविरोधात ठराव 26 ऑक्टोबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत केल्याने संपूर्ण जिल्हा परिषद बरखास्त करावी, अशी शिफारस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली. अतिरिक्त सीईओ गुडेवार यांनी केलेल्या आजच्या शिफारसीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.








