प्रतिनिधी/सांगली
जिल्हा परिषदेमध्ये मनमानी करणाऱ्या आणि जिल्हा परिषदेची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने शुक्रवारी सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषदेचे काही अधिकारी सदस्यांची आणि जिल्हा परिषदेची बदनामी करत आहेत अशा अधिकाऱ्यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती त्या पार्श्वभूमीवर सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उपसले.
Previous Articleदिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा
Next Article रसुलवाडी येथे विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू








