प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा कारागृहत संशयित असणाऱ्या सचिन नागप्पा कांबळे वय 21 या कैद्याने रविवारी पहाटे जिल्हा कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली. संशयित सचिन कांबळे हा पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी होता.
या आत्महत्येची माहिती समजताच जिल्हा कारागृह प्रशासनाचे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहचले. पंचनामा करून त्यांनी हा मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे








