कोविशिल्ड 14400 तर कोवॅक्सिनचे 12000 डोस जिल्ह्यात उपलब्ध
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात आज कोविशिल्डचे 14,400 डोसेस उपलब्ध झाले आहेत पैकी 12,000 डोसेस ग्रामीण भागातील सर्व आरोग्य संस्थांना वाटप होणार आहोत व ते 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्याने वापरले जाणार आहेत. प्रशासनाने तशी घोषणा केली दरम्यान 12,000 डोसेस कोवॅक्सिनचे आले आहेत पैकी 5,200 डोसेस फक्त सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना वाटप करून ही लस 18 ते 44 वयोगटासाठी दिली जाणार आहे.