महापालिका क्षेत्रात 18 वाढलेः ग्रामीण भागात 96 वाढलेः उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सांगली
जिल्हयात कोरोना आता आटोक्यात येवू लागला आहे. शुक्रवारी नवीन 114 रूग्ण वाढले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 18 तर ग्रामीण भागात 96 रूग्ण वाढले. उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारात एक हजार 761 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 18 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात आता रूग्ण संख्या घटू लागली आहे. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन 18 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 13 तर मिरज शहरात पाच रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 16 हजार 14 आहेत. त्यातील 92 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 96 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढीचा वेग आता घटू लागला आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात रूग्णसंख्या 100 च्या आतमध्ये आली आहे. शुक्रवारी नवीन 96 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 10 रूग्ण, जत तालुक्यात 11, कडेगाव तालुक्यात 11 तर कवठेमहांकाळ तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 13 रूग्ण तर मिरज तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात तीन, शिराळा तालुक्यात सात, तासगाव तालुक्यात 12 तर वाळवा तालुक्यात 13 नवीन रूग्ण वाढले आहेत.
उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असताना चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील एक, खानापूर तालुक्यातील एक आणि तासगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे. मिरज तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यातील एक हजार 635 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
217 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शुक्रवारी उपचार सुरू असणारे 217 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळत चालला आहे. आजअखेर जिल्ह्यातील 41 हजार 586 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जवळपास 92 टक्के रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तीन हजार 401 रूग्णांचे स्वॅब तपासले
जिल्हयात शुक्रवारी तीन हजार 401 रूग्णांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 93 रूग्णांचे आरटीपीसीमधून स्वॅब तपासले तर दोन हजार 308 रूग्णांची रॅपीड ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 114 रूग्ण वाढले आहेत.
परजिल्ह्यातील सहा रूग्ण वाढले
परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात येतात. शुक्रवारी परजिल्ह्यातील सहा नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, हैद्राबादमधील दोन, सातारा येथील एक व बेळगाव येथील एका रूग्णांचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 394 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 144 रूग्ण बरे झाले आहेत. उपचारात 44 रूग्ण आहेत. तर आजअखेर 206 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
कोरोनाची स्थिती
नवीन रूग्ण 114
उपचारात 1761
बरे झालेले 41586
एकूण 44982
मृत्यू 1635








