जिल्हय़ातील 31 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 296 वाढलेः ग्रामीण भागात 590 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
रविवारी जिल्हय़ात नवीन 886 रूग्ण वाढले आहेत. तर 716 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 32 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 31 आणि परजिल्हय़ातील एकाचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 852 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रूग्णांची संख्या 13 हजार 92 झाली आहे.
महापालिका क्षेत्रात 296 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन 296 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 226 तर मिरज शहरात 70 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 10 हजार 427 झाली आहे.
ग्रामीण भागात 590 रूग्ण वाढले
रविवारी ग्रामीण भागात 590 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 51, जत तालुक्यात 35, कडेगाव तालुक्यात 49 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 67, खानापूर तालुक्यात 29, मिरज तालुक्यात 107 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 63, शिराळा तालुक्यात 54, तासगाव तालुक्यात 63 आणि वाळवा तालुक्यात 72 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 31 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 31 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील तिघांचे मृत्यू झाले आहेत. तर कुपवाड येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन, खानापूर तालुक्यातील एक आणि मिरज ग्रामीण भागातील पाच जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील दोघांचा तासगाव तालुक्यातील तिघांचा आणि वाळवा तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 852 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया एकाचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हय़ातील सोनंद येथील 53 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 136 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
13 हजार जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही मोठयाप्रमाणात वाढत चालली आहे. रविवारी एकाच दिवसांत 716 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील 13 हजार 92 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
रविवारी 2691 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली
जिल्हय़ात रविवारी दोन हजार 691 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसी टेस्ट 1285 करण्यात आल्या तर रॅपीड ऍण्टीजन टेस्ट एक हजार 406 करण्यात आल्या आहेत. अशा एकूण दोन हजार 691 तपासणीमध्ये 886 नवीन रूग्ण वाढले आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 23192
बरे झालेले 13092
उपचारात 9248
मयत 852








