प्रतिनिधी / जत
जत शहरातील राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष वाघमोडे यांना जात पंचायतीने वाळीत टाकल्यामुळे न्याय मिळावा म्हणून शुक्रवारपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी माझ्या दारात. माझे आंदोलन म्हणत घरासमोर ठिय्या मारला आहे. तोंडाला काळे फासून व काळे मास्क काळा झेंडा उभा करून त्यांनी व्यवस्थेचा निषेध नोंदवला आहे, या अनोख्या आंदोलनाची चर्चा जत शहरात जोरदार सुरू आहे.
काही दिवसापूर्वी सुभाष वाघमोडे यांनी उसने पैसे घेतले होते व ते पैसे परत दे नाहीतर तुला जातपंचायती मधून वाळीत टाकतो, असे बजावले होते, याबाबत सुभाष वाघमोडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, त्यानंतर जात पंचायतीच्या पंचांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.
दोन दिवसापूर्वी अज्ञातांनी सुभाष वाघमोडे यांच्या घरावर रात्री दोन वाजता दगडफेक केली व त्यांच्या अंगावर गाडीवरून मारण्याचा प्रयत्न केला होता यासाठी न्याय मिळावा म्हणून सुभाष वाघमोडे हे स्वतःच्या घरासमोर काळा झेंडा, तोंडाला काळे मास्क लावून आंदोलन करत आहेत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सुभाष वाघमोडे यांनी सांगितले. तसेच संचार बंदी उठल्यानंतर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








