आटपाडी पोलिसांवर आक्षेप
प्रतिनिधी/आटपाडी
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा खोटा आरोप आणि गुंडशाही चालु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी दिला. तर पोलिसांच्या मदतीने जागा बळवविण्याऱ्या गावगुंडांना आम्ही निश्चितच हद्दपार करू असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दिला.
आटपाडी येथे राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत आवळाई येथील उत्तम जाधव या व्यक्तीने हणमंतराव देशमुख यांच्यावर केलेले आरोप व तक्रारीवर प्रहार करण्यात आला. रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, अश्विनी कासार, युवक काँग्रेसचे सुरज पाटील, जालिंदर कटरे यांची प गुख उपस्थिती होती. दिघंचीतील एका जागेच्या कारणावरून आवळाई येथील जाधव आणि दिघंचीतील मोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे.
त्याच्याशी आपला काहीही संबंध नसताना व ज्याना मी ओळखत नाही त्या उत्तम जाधव या व्यवतीने माझ्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. हा प्रकार आटपाडीतील दोन स्वयंघोषीत युवा नेत्यांच्या सांगण्यावरून झाला आहे. दिघंचीतील वडर समाजाची जागा लुटण्याचा प्रकार ज्यांनी केला त्यांना आम्ही विरोध केला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तेच लोक या जागा प्रकरणात असुन मला नामोहरम करण्यासाठी खोटा खेळ खेळला जात असल्याचे हणमंतराव देशमुख यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात जनसेवा करत अन्यायग्रस्ताना मदत करणारे हणमंतराव देशमुख यांच्यावर होणारा आरोप हास्यास्पद असल्याचे सांगितले. ही प्रवृत्ती घातक असुन अशा खोट्या तक्रारी करणा-यांवर गुन्हे दाखल करू. आटपाडी पोलीसानी या खोट्या तक्रारीची चौकशी करावी. आमचे नेते जयंतराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यावर विश्वास असुन सामाजिक क्षेत्रात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात खोटी तक्रार होणे चुकीचे आहे. अशा दृष्ट प्रवृत्तींना थारा न देण्याची सर्वपक्षीय लोकांची जबाबदारी असुन राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अशा गुंड प्रवृत्तीला थारा देणार नाही, असा दावाही रावसाहेब पाटील यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीने आटपाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून सामान्याऐवजी पोलीस गावगुंडाना साथ देत असल्याचा आरोप केला..
Previous Articleसातारा जिल्हय़ात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला
Next Article सांगलीत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद








