प्रतिनिधी / कडेगांव
जमिनीच्या वादातून निमसोड येथे सख्या चुलत भावानेच लाकडी दांडके डोक्यात घालून भावाचा निर्घृण खून केला. सूर्यकांत उर्फ सुरेश आत्माराम जाधव (वय-35 रा. नीमसोड) असे या मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित भगवान दाजी जाधव (60) व कैलास भगवान जाधव( 42, दोघेही रा. निमसोड) यांच्या विरोधात कडेगांव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
सूर्यकांत जाधव व त्यांचे चुलते भगवान जाधव व भाऊ कैलास जाधव यांचा जमिनीचा वाद सुरू आहे. काल, शुक्रवार ( दि 5 ) रोजी सायंकाळी यांच्यातील हा वाद पुन्हा पेटला. या वादातून भगवान जाधव व त्यांचा मुलगा कैलास जाधव आणि सूर्यकांत जाधव यांच्यात भांडण झाले. यावेळी लाकडी दांडके संशयित आरोपी कैलास जाधव यांने सूर्यकांत जाधव यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे सूर्यकांत गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Previous Articleखानापूरनजीक भीषण अपघातात महिला ठार, दोघे जखमी
Next Article बेंगळूर: दररोज ६० हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट








