प्रतिनिधी / आटपाडी
दूध दरामध्ये वाढ करावी, अशी मागणी करत भाजप व महायुती समर्थकांनी आटपाडी तालुक्यात आंदोलन केले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दुभत्या जनावरांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला. आटपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, तालुका अध्यक्ष विलास काळेबाग, तानाजी यमगर, प्रभाकर पुजारी, विष्णू अर्जुन, आण्णा जाधव, आरपीआय चे राजेंद्र खरात, अण्णासो रणदिवे, उन्मेष देशमुख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह शेतकऱ्यांनी आपली दूध देणारी जनावरे रस्त्यावर बांधून त्यांना दुधाचा अभिषेक घालून अनोखे आंदोलन केले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला. दुधाला एक लिटरला 10 रुपये अनुदान दिले पाहिजे तसेच दुधाच्या भुकटी ला पन्नास रुपये अनुदान दिले पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सध्याचे सरकार शेतकऱ्यांचे विरोधातले आहे. सरकारने राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दुधाचे दर पडले आहेत. दररोज एक कोटी 40 लाख लिटर दूध गोळा होत आहे. यामधील दहा लाख लिटर दूध शासन खरेदी करत आहे परंतु ते दूध जयंतराव पाटील, अजितदादा पवार, सुनील केदार, रामराजे निंबाळकर, बाळासाहेब थोरात आधी मंत्र्यांच्या व नेत्यांचे दूध संघाचेच सरकार दूध घेत आहे. सरकार स्वतः पुरणपोळी खात असून राज्यातील शेतकरी उपाशी आहे. अशी टीका ही आमदार पडळकर यांनी केली.
Previous Articleकर्नाटक : १ ऑगस्टपासून रविवारचा लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू हटवला
Next Article जगभरात 1.11 कोटी रुग्ण कोरोनामुक्त








