प्रतिनिधी / जत
जत शहरातील विठ्ठलनगर येथे रविवारी दुपारी ४वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून तुळसाबाई यशवंत डोंबाळे ( वय ५० ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जत शहरात रविवारी दुपारी 3 च्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. यावेळी तुळसाबाई डोंबाळे या राहत असलेल्या जतच्या विठ्ठलनगर पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंत मळ्यात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरु झाल्याने त्या लिंबाच्या झाडाखाली उभ्या होत्या. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना समजताच माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, योगेश मोटे, नितीन साळे,पप्पू कांबळे, मेहबूब शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले,शरद शिंदे,तलाठी रवींद्र घाडगे,कोतवाल सुभाष कोळी,पोलीस पाटील मदन माने -पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








