प्रतिनिधी / जत
जत शहरातील कन्याशाळा, स्वामी गल्ली येथे भांडणे सोडविण्यास गेलेल्या एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. दत्तात्रय शेकाप्पा कोळी (वय ३१, रा. मंगळवार पेठ, जत) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात दत्तात्रय कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संतोष गुरूदत्त कोळी (वय २८) व राकेश विठ्ठल कोळी (वय २९, दोघे रा. थोरली वेस, कोळी गल्ली, जत) अशा दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास संतोष कोळी व राकेश कोळी हे दोघे दारूच्या नशेत भांडण करत होते. यातील फिर्यादी दत्तात्रय कोळी याने त्यांची भांडणे सोडविण्यास तेथे गेला. दरम्यान, तु आमची भांडणे सोडविणारा कोण असे म्हणत दोघांनी ही आपल्याकडे असणार्या लहान चाकूने दत्तात्रय यांच्या तोंडावर, अंगावर व डोक्यात गंभीर वार करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. यात दत्तात्रय हे गंभीर जखमी झाले असून या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार एस. ए. कणसे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








