प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील शेगावजवळ सोने व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यात आला. सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी जत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची तीन पथके तपासाठी रवाना झाले आहेत.
अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील पलसखेड सोने व्यापारी बाळासाहेब वसंत सावंत हे बेळगावहुन चार किलो सोने घेऊन आपल्या चारचाकी गाडीतून नांदेड येथे सोने देण्यासाठी निघाले होते. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ते शेगावजवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या चार आज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण करून व डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील सव्वा दोन कोटीचे चार किलो सोने लंपास केले. या प्रकरणी जत पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, एलसीबीचे अधिकारी यांनी भेट दिली आहे, तीन पथके तपासाठी रवाना झाली आहेत.
Previous Articleग्रामपंचायत निवडणूक : सडोली खालसा येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
Next Article गुरूवारी जिह्यात कोरोनाचे दहा रुग्ण








