वार्ताहर / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील सय्यदवाडी येथील डोंगरावरून गावात आलेल्या मोरावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने जखमी झालेल्या मोराची सुटका करून वनविभागाने तातडीने औषध उपचार केल्याने त्याचा जीव वाचला त्यामुळे वन्यजीव प्रेमीकडून कौतुक होत आहे.
मिनी कोकण समजण्यात येणाऱ्या पश्चिन भागात मोरांचे थवे रस्त्यावरून भटकताना दिसतात त्याचबरोबर रानडुकरे, बिबट्या आणि विविध प्राणी व पक्ष्यांचा मुक्तसंचार पहावयास मिळतो. सध्या पावसाने दडी मारली असल्याने भागात पर्यटक भटकंती करतानाही दिसत आहेत. बहुतांश वाड्या – वस्त्या डोंगर कपारी व पठारावर वसल्या असून त्यातीलच एक म्हणजे सय्यदवाडी होय. याच गावाच्या पश्चिमेला डोंगर असून येथून मोर गावातून खाली शिवारात जात असताना गावातील कुत्र्यांनी एका मोराचा पाठलाग केला यात हा मोर जखमी झाला आणि एका पडक्या भिंतीच्या आसऱ्याला गेला आणि तो तब्बल 2 तास, अखूड दोन भिंतीत तसाच अडकून राहिला.
याची कल्पना वनविभागाच्या वनरक्षक देवकी तहसिलदार यांना मिळताच त्यांनी वनपाल चंद्रकांत देशमुख,वनमजूर अधिक शेटके, शिवाजी सावंत यांना घेऊन घटना स्थळी धाव घेऊन अडकलेल्या मोरास सुखरूप बाहेर काढून, डॉक्टरकरवी त्याच्यावर उपचार करून, शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयात अधिवासात ठेवण्यात आले असून मोराची तब्बेत बरी झाल्यावर, त्यास जंगलात सोडण्यात येणार आले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक वन्यजीव प्रेमी व नागरीकांच्यातून कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








