महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनीही दळवी दाम्पत्याचे केले कौतुक
प्रतिनिधी/सांगली
विश्रामबागच्या उर्मिलानगरीतील चाणक्यपुरीमधील दळवी आजी आजोबानी घरच्याघरीच सुंदर बाग फुलवली आहे. दळवी दामत्यांनी घरच्या कचऱ्याचे घरच्या घरीच कंपोस्टिंग करून बाग, टेरेस व घर फुलवले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनीही दळवी दाम्पत्याचे कौतुक केले.
या दळवी दाम्पत्यांच्या उपक्रमाची माहिती समजताच भागाचे नगरसेवक संजय कुलकर्णी, गटनेते विनायक सिंहासने, वैद्यकिय आरोग्याधिकारी रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर व सोसायटी मधिल रहिवासी यानी पहाणी केली. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतील पंचतारांकित घर या उपक्रमाची माहिती त्यांना देण्यात आली. ही संकल्पना दळवी दाम्पत्याना फार आवडली तसेच यामध्ये सहभाग घेत असल्याची दळवी यांनी सांगितले. तसेच यावेळी सोसायटीमध्ये असणाऱ्यां इतर नागरिकांची मिटिंग घेऊन त्यांनाही महापालिकेच्या पंचतारांकित घरे योजनेची माहिती देण्यात आली.
Previous Articleभोपाळ : भाजपचे खासदार नंदकुमार चौहान यांची प्रकृती गंभीर
Next Article रत्नागिरी : महागाईच्या विरोधात दापोलीत निदर्शने








