विशेष प्रतिनिधी/ शिराळा
ग्राहक हक्काचे संरक्षण व संवर्धन करणे व या अनुषंगाने ग्राहक समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून जिल्हापातळीवर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत आहे. या समितीवर येथील उद्योजिका सुखदा सुमंत महाजन यांची निवड करण्यात आली. उद्योजिका महाजन यांची फेर निवड करण्यात आली आहे. महाजन गेली १५ वर्ष सामाजिक कार्यात काम करत असुन सांगली ग्राहक पंचायतीच्या महिला प्रतिनिधी काम करत आहेत.
सांगली येथे नुकतीच जिल्हाधिकारी, ग्राहक मंचाचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक परिषदेचे निमंत्रक यांची बैठक होऊन २० अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. ग्राहकाचे प्रबोधन व्हावे, त्यांच्या समस्या सुटाव्यात, ग्राहक जागृत व्हावा या दृष्टाने महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यानी २०१३ रोजी निर्णय घेऊन जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषेदेची स्थापना केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या २० अशासकीय सदस्यांची निवड पुढालप्रमाणे-
भास्कर उर्फ ज्ञानेश्वर मोहीते, चंद्रशेखर गोब्बी (जत) विनायक पाटील (कासेगाव), सुखदा महाजन ( शिराळा), प्रकाश फडके (सांगली), ॲड. महेश शानभाग( विटा) सर्व ग्राहक पंचायत, सांगली., डॅा. ज्ञानचंद्र पाटील (सांगली), सुरेश भोसले-हराळे (मिरज) दोघेही ग्राहक पंचायत, महाराष्ट्र. धन्यकुमार धावते (सांगली) राष्ट्रीय ग्राहक संघटना. माणिकराव पाटील ( तासगाव ) अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सांगली. शाळा/ महाविदयालय प्रतिनिधी डॅा. विद्याधर किट्टद (जत), डॅा. मेघा पवार उर्फ चंपाताई बांधले (भिलवडी), वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी डॅा. अशोक देशपांडे (सांगली), डॅा. राम लाडे ( मिरज ). व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आलमशाह मोमीन ( तासगाव ), अरूण दांडेकर ( सांगली),. पेट्रोल व गॅस व्यवसाय प्रतिनिधी जयमाला पाटील( पलुस ), कौशिक वग्याणी (आष्टा),. शेतकरी प्रतिनिधी – दुष्यांत माने ( कर्नाळ ) ग्राहक पंचायत महाराष्ट्र, विठ्ठल पाटील( सोनकिरे) या प्रमाणे असुन हि निवड २०२१ ते २०२४ या कालावधी करीता आहे.