प्रतिनिधी / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील 55, 32 व 28 वर्षीय पुरुष व नाठवडे येथील 8 वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून गवळेवाडी येथील एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे.
येथील रुग्णांचे मुंबई कनेक्शन नसल्याने कोरोनाचा संसर्ग पसरला कसा असा प्रश्न समोर येत आहे. या प्रश्नांची उकल झाल्यास संसर्ग रोखता येईल त्यामुळे रुग्णांनी सत्य माहिती आरोग्य विभागाला द्यायला हवी. काल येथील 55, 32 व 28 वर्षीय पुरुषांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील रुग्ण संख्या 14 झाली असून त्यांच्या संपर्काल 5 लोकांना शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले आहे.
कुंभवडेवाडी येथील अगोदर सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मुलाला शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले होते. त्या 8 वर्षाच्या मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, वैधकीय अधिकारी वासिम जमादार, ग्रामसेविका मुलाणी, डॉ. रेणके, (सी.एच.ओ.)आरोग्य सहाय्यक एन. एम. मुल्ला, आरोग्य सेवक पी. यु.शिंदे, आरोग्यसेविका महाडीक, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उपाय योजना सुरु केल्या आहेत. तर आरोग्य विभागाच्यावतीने संपर्कातील लोकांची यादी काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.