कुपवाड / प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने तब्बल १४३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली. कुपवाड शहर तसेच विस्तारीत परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांवर कारवाई करून कुपवाड पोलिसांनी गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे.
गणेशोत्सव व नवरात्र सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार कुपवाड पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवुन त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडणार नाही याची दखल घेतली आहे.
सीआरपीसी १४४ (३)प्रमाणे ६, मुंबई दारुबंदी अधिनियम ९३ प्रमाणे ५, मुंबई पोलिस अधिनियम ५६ प्रमाणे २, सीआरपीसी १०७ प्रमाणे ४०, सीआरपीसी १४९ प्रमाणे ८०,तर ११० प्रमाणे १० अशा १४३ जणांवर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे. यापुढील काळात कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही गुन्हेगाराने व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास तसेच शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सपोनि पाटील यांनी दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








