सांगली / प्रतिनिधी
वीज बिलाबाबत सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील खोटरड्या महाविकास आघाडी सरकारला हिसका दाखवू असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे यांनी दिला.
महिला मोर्चाच्या वतीने खणभाग येथील वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या, राज्यातील सरकार खोटारडे आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करू अशी ग्वाही सरकारने दिली होती. त्यांनतर १०० युनिट पर्यन्तचे वीज बील माफ करतो म्हणाले. आता याउलट भूमिका घेतली आहे. थकीत वीज बिल असलेल्या नागरिकांची कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे अन्यायकारक आहे. यावेळी राज्य शासनाचा निषेध करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कारकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.








