वार्ताहर / येळवी
खैराव (ता. जत)येथे एका महिलेने रागाच्या भरात दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे .यात दोन बालकाचा दुर्देवी अंत झाला .महिला मात्र बचावली आहे. सुप्रिया शंकर बुरुंगले (वय. २ वर्षे)समर्थ शंकर बुरुंगले (वय .९ महिने ) असे मृत झालेल्या बालकांची नावे आहेत .रूपाली शंकर बुरुंगले वय .४० मुळगाव लोणार (ता .मंगळवेढा) बचावलेल्या महिलेचे नाव आहे. निष्पाप बालकांचा अंत झाल्याने लोणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,रूपाली शंकर बुरुंगले हिचे लोणार (ता .मंगळवेढा) येथील शंकर बुरगले यांच्याशी ४ वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन मुले होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रूपालीने खैराव( ता.जत ) हद्दीत असलेल्या स्वतःच्या विहिरीत दोन्ही मुलाना टाकले. व नंतर स्वतः उडी घेतली. यात दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांनी पाहिल्याने सदरच्या विहिरीतील पाणी वीज पंपाच्या साह्याने तीन तास काढण्याचे सुरू होते. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नाने विहिरीतील मयत झालेले दोन बालके काढण्यात आली यावेळी रूपालीला विहिरीतून ग्रामस्थांनी बाहेर काढले .
पालीने विज पप्पा सोबत असलेल्या रस्सीला पकडल्याने बचावली आहे. आत्महत्येचा प्रयत्नाचे कारण नेमके समजू शकले नाही. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस नाईक बजरंग थोरात, संजय माने यांनी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. दोन्ही बालकांच्या मृताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय जत येथे करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.