अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दौरा ; खा. धैर्यशील माने यांचे सासरे कोरोना पॉझिटिव्ह
वार्ताहर / वाटेगाव
सासऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे कुटुंबीयांसह १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन झाले आहेत. या दिवशीच त्यांनी वाटेगाव दौरा केल्यामुळे वाटेगाव परिसरात अनेक लोकांची पाचावर धारण बसली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे अभिवादन करण्यासाठी शनिवारी वाटेगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करत अण्णाभाऊंच्या शिल्पसृष्टीस भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत वाळवा तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने हे जनसंपर्क असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी वाटेगावमध्ये काही ठिकाणी भेटी दिल्या, तसेच शिराळा तालुक्यातील बांबवडे गावासही भेट दिली.
वाटेगावात यापूर्वी ५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात खासदार धैर्यशील माने यांनी वाटेगाव दौरा केल्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या सासऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगत तातडीने स्वतःसह कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतल्याने वाटेगावसह परिसरातील खासदारांच्या संपर्कात आलेल्या गावपुढाऱ्यांची व कार्यकर्त्यांची पाचावर धारण बसली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








