प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यात कोरोनाने दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगरूळ येथील एकजण सांगलीत उपचार घेत होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे मंगरूळसह खानापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान रविवारी तालुक्यातील दहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.
खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल गेल्या सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सांगली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सांगली येथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर तालुक्यात शोककळा पसरली आहे. कोरोनामुळे तालुक्यात यापूर्वीच वेजेगाव येथील 47 वर्षे व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगरूळ येथील हा दुसरा मृत्यू झाला आहे.
दरम्यान रविवारी खानापूर तालुक्यात दहा लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विट्यातील तीन, वेजेगाव येथिल तीन आणि चिखलहोळ येथील चार लोकांचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. विटा आणि वेजेगाव येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या 52 आणि 32 वर्षीय महिलांची रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वेजेगाव येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या अन्य दोन तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर विट्यातील एक 70 वर्षीय वृद्ध आणि 60 वर्षीय वेजेगाव येथील एका व्यक्तीचा खासगी लॅब मधील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिखलहोळ येथील बाधित व्यक्तीच्या संबंधित एकाच कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.
दरम्यान कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रूग्णांना विट्यातील संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातील 36 लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे यांनी दिली.
खानापूर तालुक्यात रविवार 2 ऑगस्ट अखेर एकूण 74 रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी 34 जण बरे झाले आहेत. तर 40 जण उपचारात आहेत. यांपैकी 16 रुग्ण सांगलीत तर 21 रुग्ण विट्यातील कोव्हीड केअर सेन्टर मध्ये आणि दोन रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








