प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार सुरूच आहे. तालुक्यातील वेजेगाव येथे एका गलाई व्यवसायिकाचा मृत्यू झाला. तथापि मृत्यूनंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तसेच याच गावातील अन्य एक महिला आणि मुलगा तसेच चिखलहोळ येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. काल विट्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्भवती परिचारिका आणि पालिकेच्या तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे विटा पालिकेचे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आज तालुक्यातील पहिला रुग्ण कोरोना संसर्गाचा बळी पडला आहे. वेजेगावातील 47 वर्षीय गलाई व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यूपश्चात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते आंध्र प्रदेशातून आलेला वेजेगावात आले होते.
याच गावातील अन्य एक महिला आणि मुलगा यांना दोन दिवसांपासून कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आलेली आहे. या दोघांनाही कराड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील चिखलहोल येथील एका व्यक्तीला श्वसनाचा त्रास होता. त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








