प्रतिनिधी / इस्लामपूर
देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी रासायनिक खतांची दरवाढ केंद्र शासनाने तातडीने मागे घ्यावी. अन्यथा तीव्र जनजांदोलन उभा करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे दिला. यावेळी त्यांनी रासायनिक खतांची तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध केला.
तहसिलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. पाटील यांनी सोमवारी याप्रश्नी राज्यभर आंदोलन होईल,असा इशारा दिला होता.यावेळी सर्वच पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात केंद्रातील भाजपा सरकारवर कडाडून हल्ला चढविला.








