वार्ताहर / सलगरे
खटाव (ता. मिरज) येथे घराच्या अंगणात खेळत असताना विहिरीत पडून ऐश्वर्या गावडे या सहा वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
दरम्यान ऐश्वर्या ज्या मुलांसमवेत खेळत होती. त्यांच्याकडे काही ग्रामस्थांनी चौकशी केली असता कोणीतरी दोन अज्ञात व्यक्ती ऐश्वर्या घेऊन विष्णूवाडीकडे गेल्याचे समजले. त्यामुळे प्रारंभी तिचे अपहरण झाल्याची चर्चा होती. मात्र, विहिरीत तिचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.








