वार्ताहर/सलगरे
खटाव (ता. मिरज) गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभा बोलावण्याचे आदेश गटविकास अधिकारी आफ्पासो सरगर यांनी दिले आहेत.
खटावमध्ये भरवस्तीत असणाऱ्या देशी दारु दुकानामुळे गावातील ग्रामस्थांना, लहान मुलांना तसेच महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खटाव येथील ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील कारवाई झालेली नाही. सदरचे देशी दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महिला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची सुचना गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी ग्रामपंचायत कार्यालय, खटाव येथील ग्रामसेवक तसेच सरपंच यांना दिल्या आहेत. तसेच शासन नियमाप्रमाणे सभा घेणेबाबत तसेच योग्य ती कारवाई ग्रामस्तरावरून करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा, यासंदर्भातील आदेश गटविकास अधिकारी यांनी काढलेले आहेत.
गावातील सुजाण नागरिकांनी व महिलांनी मोठय़ा संख्येने या ग्रामसभेत सहभागी राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








