उदगाव /वार्ताहर
गेली तीन दिवस बंद असलेला सांगली कोल्हापूर राज्यमार्ग आज सकाळी सुरु करण्यात आला. मात्र अजूनही टोल नाक्याजवळील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली रस्त्यावर पाणी आहे. यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहनांची मोठी गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
येथील टोल नाक्याजवळील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली पुराचे पाणी आल्याने गेली तीन दिवस सांगली-कोल्हापूर जिल्ह्य जोडणारा राज्य महामार्ग बंद करण्यात आला होता. आज, मंगळवारी सकाळी पुराचे पाणी कमी झाले आहे. या ठिकाणी जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगीडे यांनी टीमसह रस्त्याची पाहणी करून सकाळी या मार्गावरील सर्व वाहतूक सुरू केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









