प्रतिनिधी / सांगली
कोविड 19 लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यासाठी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आला आहे. सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते विशाल पाटील यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. मनपा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात ही जागृती मोहीम आणि लसीकरणासाठी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय त्यांनी उपलब्ध करण्यात आली आहे.
या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी ६ मार्च रोजी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर करण्यात आला. प्रत्येक प्रभागात ही वाहने जाऊन तेथील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणार आहेत. युवा नेते विशाल पाटील यांच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य, गोरगरीब आणि गरजूंची मोठी सोय होणार आहे. यावेळी नगरसेवक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.








