सर्वपक्षीय कृती समितीची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत घेण्यात आलेल्या ऑनलाईन महासभेमध्ये अनेक बेकायदा ठराव घुसडण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोक्याच्या जागा कवडीमोल दराने विकले आहेत असा आरोप सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
ऑनलाईन महासभा घेतल्यामुळे सर्व नगरसेवकांना विषयांची नेमकी माहिती समजू शकत नाही त्यामुळे बेकायदा आणि महापालिकेच्या हिताच्या विरोधातील ठरावांना विरोध होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेची 23 रोजी होणारी महासभा ऑफलाईन घेण्यात यावी तसेच मार्चपासून आतापर्यंत झालेल्या सर्व ऑनलाईन महासभेतील ठरावांची चौकशी करून ते रद्द करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना या मागणीचे निवेदन दिले.








