दिघंचीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अधिकाऱ्यांना सूचना
दिघंची / वार्ताहर
कोरना आजारातून मुक्त झाल्यानंतर तानाजीराव पाटील पुन्हा एकदा जनतेसाठी मैदानात उतरले आहेत. मार्च महिन्यापासून कोरोना ग्रस्तांसाठी ऑक्सीजन बेड उपलब्ध करणे त्यांना मानसिक आधार देणे यासर्व धडपडीत तानाजीराव पाटील यांचा संपर्क कोरोनाग्रस्त रुग्णांशी आला त्यामुळे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली. परंतु कोरोनामुक्त होताच पुन्हा एकदा तानाजीराव पाटील जनसेवेसाठी मैदानात उतरले. रविवारी दिघंचीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची व रस्त्याची त्यांनी पाहणी केली.
आपल्या धडाकेबाज कामामुळे तानाजीराव पाटील यांची ओळख जिल्हाभर आहे. मार्च महिन्यापासून तानाजीराव पाटील स्वतः कोरोनाग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देत होते. तसेच ऑक्सिजनची बेड उपलब्ध करणे, शासन स्तरावर उपाय योजना करणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
कोरोना मुक्तीनंतर रविवारी तनाजीराव पाटील यांनी थेट दिघंची परिसरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शुक्रवारी अतिवृष्टीने दिघंची परिसरात हाहाकार माजवला. शेतीची पिके पाण्यात गेली. ढोले मळा येथील रस्ता वाहून गेला होता. यावेळी तानाजीराव पाटील यांनी बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. व कृषी अधिकाऱ्यांसह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.तसेच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यची ग्वाही दिली.
दिघंची ढोले मळा येथील पुल पाण्याने वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली होती याबाबत ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव यांच्यासह सागर ढोले यांनी पुढाकार घेऊन रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता सुरू केला. त्यांनतर तानाजीराव पाटील यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना मुक्त झाल्यानंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तानाजीराव पाटील यांनी दिघंची भागातील शेतकऱ्यांना दिलासा देत शासनस्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर ढोले , बाळासाहेब होनराव ,कॉन्ट्रॅक्टर अमोल साळुंखे,संजय मोरे,मनोहर मोरे,अजित शिरकांडे आदी उपस्थित होते.
Previous Articleसांगली : आळसंदमध्ये आज एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
Next Article अपघातातील ‘त्या’ जखमी तरूणाचे निधन








