वार्ताहर / कुंडल
कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याची भिती न बाळगता दक्षता घेतली तर संसर्गाची साखळी तुटू शकते असे आवाहन जिल्हा परीषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात सर्वत्र वाढणार्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व नागरीकांचा कोरोना चाचणीला होणारा विरोध याबाबत ते दै.तरुण भारतशी बोलत होते.
सद्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने प्रशासनाने वाढणरा संसर्ग थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अॅन्टीजेन रॅपीडटेस्ट करण्यास सुरुवात केली असून कोरोनाची साखळी थांबविण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या टेस्टला विरोध न करता सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगतले. स्वॕब घेतलेले अथवा रॕपीड टेस्ट झालेल्या सगळ्यांचेच अहवाल पॉझिटिव्ह येत नाहीत, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या पैकी बरे होऊन घरी जाणार्यांचे प्रमाणही निम्म्यापेक्षा जास्त असल्याने स्वॅब दिला म्हणजे आपण पॉझिटिव्हच येणार ही भिती अनाठायी असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा काम करत असल्याने त्यांना नागरीकांनी सहकार्य करणे आवश्यक असून नागरीकांनी आपल्यासह कुटूंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठीकाणी न जाणे, अनावश्यक बाहेर न फिरता घरी थांबून तपासणीसाठी येणार्या आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शरद लाड यांनी यावेळी केले.
पलूस तालुक्यातील एका गावातील व्यक्तीला कोरोना टेस्टला भितीपोटी विरोध करणे चांगलेच महागात पडले .आरोग्य अधिकारी तपासणीसाठी तीथे गेले असता त्या युवकाला लक्षणे दिसत असल्याने त्याचा स्वॅब घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने व कुटूंबियांनी विरोध करीन स्वॅब देण्याचे नाकारले. मात्र काही दिवसानंतर त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने त्याने स्वतः येऊन ग्रामिण रुग्णालयात स्वॅब दिला, मात्र खुप उशिर झाला होता तो तब्बल एक महिण्याने पॉझिटिव्ह आला आता त्याच्यावर सांगलीतील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून या दरम्यान तो अनेकांच्या संपर्कात आल्याने ते शोधणे प्रशासनापुढे आव्हान ठरले आहे.- डॉ.किरण भोरे वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ. केंद्र, कुंडल
Previous Articleसातारा जिल्ह्यात 697 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
Next Article झारखंडमधील देवघरमध्ये लवकरच होणार दुसरे विमानतळ








