92 टक्के नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह : जिल्ह्यातील नागरिकांच्यात कोरोनाविरोधी प्रतिपिंडे तयार होत आहेत
महिनाभरात तीन लाख 40 हजार चाचण्याः 28 हजार नागरिक पॉझिटिव्ह
विनायक जाधव / सांगली
कोरोनाची दुसरी लाट जिल्हÎासाठी अत्यंत घातक ठरली होती. या दुसऱया लाटेतून जिल्हा बाहेर पडत आहे. गेल्या महिनाभरात जिल्हÎाचा पॉझिटिव्हीटी रेट (बाधित दर) 19 टक्केवरून आता आठ टक्केवर स्थिर झाला आहे. ही दिलासादायक गोष्ट आहे. जिल्हÎातील नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधी ऍण्टीबॉडीज (प्रतिपिंडे) चांगली तयार होत आहेत. त्यामुळे दररोजच्या चाचण्यामध्ये 92 टक्के लोकांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. दहा जूनपासून नऊ जुलैपर्यत जिल्हÎात तीन लाख 39 हजार 841 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 28 हजार 292 बाधित रूग्ण आढळले याचाच अर्थ तीन लाख 11 हजार 549 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
19 टक्केवरून आठ टक्के बाधित दर
जिल्हÎात कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोनाचा बाधित दर अत्यंत वाढला होता. तो एप्रिल-मे मध्ये तर 32 टक्के इतका झाला होता. त्यामुळे जिल्हÎात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. याचा परिणाम काही दिवसांनी चांगला दिसून आला आहे. जिल्हÎाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 32 वरून 19 टक्के इतका खाली घसरला होता. त्यामुळे जिल्हÎाला दिलासा मिळाला होता. पण त्यानंतर मात्र हा पॉझिटिव्हीटी रेट खाली उतरताना दिसून येत नव्हता. पण गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या चाचण्या मोठयासंख्येने वाढविल्या आहेत. त्यामुळे आता हा दर आठ टक्केवर येवून स्थिरावला आहे. आणखीन तीन ते पाच टक्के तो कमी करण्याचे आव्हान जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या समोर आहे.
चाचण्या दुप्पट करूनही रूग्णसंख्या तितकीच
जिल्हÎात आरटीपीसीआर आणि रॅपीड ऍण्टीजन टेस्ट अशा दोन प्रकारे कोरोनाची चाचणी करण्यात येते. एप्रिल-मे मध्ये या दोन्ही चाचण्या करण्यात येत होत्या पण त्याचे प्रमाण दिवसाला सरासरी सहा ते सात हजार इतके होते. त्यावेळी जिल्हÎात दररोज सरासरी 1100 ते 1200 रूग्ण आढळून येत होते. पण गेल्या महिन्याभरापासून या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दिवसाला सध्याच्या स्थितीत त्या सरासरी 11 ते 13 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्या वाढविल्याने हा पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढलेला दिसून येण्याची गरज होती. पण या चाचण्या वाढविल्यानंतर मात्र कोरोनाचा आकडा हा हळूहळु कमी कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे जरी सध्या दररोज सरासरी 900 रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात चाचण्या दुप्पट केल्यानंतर तो आकडा आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
92 टक्के अहवाल निगेटिव्ह
जिल्हा गेल्या दीड वर्षापासून कोरोनाशी लढत आहे. या कोरोनाच्या लढाईमध्ये शासनाने जे नियम सांगितले आहेत. त्या नियमानुसार मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिन्स्टसिंगचा वापर करणे हे नियम पाळले जात असल्याने जिल्हÎात कोरोनाचा फैलाव हा थांबला आहे. पण तरीसुध्दा अनेकांना किरकोळ आजार जरी झाले तरीसुध्दा त्याची सक्तीने कोरोनाची चाचणी केली जाते. जेणेकरून त्याच्यामुळे इतरांना हा कोरोना होवू नये याची दक्षता घेतली जाते. पण यामध्ये 92 टक्के लोकांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे जिल्हÎातील नागरिकांच्या शरिरात कोरोनाविरोधी प्रतिपिंडे तयार झाली आहेत असेच म्हणावे लागेल.
लसीकरण व प्रतिपिंडे तयार होवू लागल्याने पॉझिटिव्हीटी रेट कमी : डॉ. साळुंखे
जिल्ह्यात कोरोना होवू नये म्हणून जे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम सध्या दिसून येत आहे. तसेच नागरिकांच्यामध्ये प्रतिपिंडे तयार होत असल्यानेही पॉझिटिव्हीटी रेट कमी होत चालला आहे. पण तो आणखीन कमी करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
डॉ. संजय साळुंखे
तारीख चाचण्या बाधित रूग्ण
10 ते 20 जून 110403 9668
21 ते 30 जून 113598 9748
एक ते 09 जुलै 115840 8876
एकूण 339841 28292