वार्ताहर / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील कोकरूड चेकपोस्टवर नेमणुकीस असणाऱ्या पोलिसांना, येथील महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. जिल्हाबंदीसाठी रात्र दिवस हद्दीची राखण केल्याबद्दल आभार मानले.
मार्च महिन्यापासून जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे, तेव्हापासून सांगली व कोल्हापूर जिल्हा यांच्यामध्ये कोकरूड पुलाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवर असणाऱ्या पोलीस कर्मचारी त्याचबरोबर इतर कर्मचारी दिवस – रात्र ड्यूटी करत आहेत. आज रक्षाबंधन असले तरीही त्यांना ड्युटीमुळे घरी जाता आले नाही. हीच उणीव कोकरूड येथील महिलांनी लक्षात घेऊन, या पोस्टवर कार्यरत असणाऱ्या पोलिसांना राख्या बांधून भरून काढली.
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी करण्यात आलेली जिल्हाबंदी त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पायबंद बसला आहे. हे केवळ जिल्हाबंदी मुळेच शक्य झाले आहे. म्हणून या ठिकाणी आलेल्या महिलांनी चेक पोस्टवर कार्यरत असणाऱ्या पोलिस व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी पोलीस नाईक, विशाल भिसे ,पोलीस कॉन्स्टेबल – सावंत, आदी कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








