शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजपाकडून सुरू
प्रतिनिधी / सांगली
या देशातील मोदी सरकारला पाकिस्तानपेक्षा या देशातील शेतकरी मोठा शत्रु वाटतो. त्यामुळेच त्याला देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान मोदी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर आणि शेतकऱ्यांचे वाटोळे करणारे तीन कायदे त्यांने संसदेत जोर जबरदस्तीने करून घेतले आहेत. याला आता कायदेशीर लढाई करून आणि लोकशाही मार्गाने विरोध करूनच हे कायदे रद्द करावे लागतील असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषि कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी काढण्यात आलेल्या टॅक्टर रॅलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष आमदार मोहनराव कदम हेते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश निरीक्षक सोनल पटेल, पुण्याचे नेते मोहन जोशी,आमदार विक्रम सावंत, शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, जितेश कदम, तोफिक मुलाणी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत शहर जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. तर आभार जिल्हापरिषद सदस्य जितेंद पाटील यांनी मानले.