प्रतिनिधी / सांगली
कृष्णा नदीत सातारा जिल्ह्यातील पाच नद्यातून सुमारे 50 हजार क्युसेस विसर्ग मिसळतो आहे. वारणा धरणातून 12 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. वारणा व अन्य नद्यातूनही कृष्णेत पाणी वाढते आहे. कृष्णा पातळी झपाट्याने उंचावते आहे. रविवारी दुपारी कोयना धरणात 90 टिएमसी पाणी साठले होते. कोयनेतून 35732 क्युसेक तारळीतून 3200 उरमोडीतून 5662, कण्हेर 5444 क्युसेस, धोम 450 क्युसेस पाणी कृष्णेत येते आहे.
सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर असून धरणपाणलोण क्षेत्रात संततधार सुरु आहे,अलमट्टी धरणातूनही दिड लाख क्युसेक विसर्ग सुरु असून धरणात 113 टिएमसी पाणी संचय आहे. कृष्ण, वारणा, मोरणा नद्याना पूर आला असून श्री क्षेत्र औदुंबर येथील मंदिर परिसरात पाणी आले ,सांगलीत आयर्विन पूलाजवळ दुपारी पाणी पातळी 24 होती कृष्णा अजून पात्रात आहे पण पाणी झपाट्याने वाढते आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








