वार्ताहर / कुंडल पुणदी (ता.पलूस) येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा कृष्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. आज, सोमवारी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत कुंडल पोलीसात पोलीस पाटील पांडुरंग रामू जाधव यांनी फिर्याद दिली.
कुंडल पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकिशोर हिंदुराव कुंभार (रा. पुणदी, वय 11) आणि पवन धुळेश्वर पाटील (रा. पुणदी वय 13) हे दोघे पोहायला गेले होते. बराच उशीर ते घरी परतले नाहीत म्हणून घरातील लोकांनी शोधाशोध केली असता ते दोघे कृष्णा नदीपात्राच्या पाणवठ्याजवळ मिळून आले. अधिक तपास हवालदार के. बी. हारूगडे व गणेश तांदळे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








