भारतभीम जोतीराम दादा कुस्ती आखाड्याला लागली अखेरची घरघर
प्रतिनिधी / सांगली
सांगली येथील कोल्हापूर रोडवरील भारतभीम जोतिराम दादा पाटील सावर्डेकर कुस्ती आखाड्याची दुरावस्था झाली असून महापालिकेने येथील सांडपाण्याच्या निचऱ्यासह आखाडा चांगला करण्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केली आहे.
येथे मनपा पाणी पुरवठा विभागाची पाईप लाईन गेल्या कित्येक वर्षांपासून लिकेज असक्यामुळे सकाळच्यावेळी प्रेशरने पाणी गळती होत असते त्यामुळे परिसरात पाण्याची डबकी तयार झाली आहेत. तसेच तेथे स्थानिक नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आला होता. त्यावर आता फिरते शौचालय ठेण्यात आले आहेत व काही ठिकाणी झाडे झुडपे मोट्या प्रमाणात उगवली आहेत.
कुस्ती आखाडा घाणीचा आखाडा बनला आहे ही दुरवस्था दूर करून कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना आखाडा व्यवस्थित करून देण्यात यावा तसेच फिरण्यासाठीचा ट्रॅक दुरुस्त करण्यात यावा. तसेच पाणी पुरवठा विभागाची पाइपलाईन दुरुस्ती करून साचलेले पाणी काडून टाकून डबकी मुजवण्यात यावीत अन्यथा कुस्ती प्रेमी आणि स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उदय भडेकर,आनंद देसाई,अविनाश जाधव,धीरज मोरे उपस्थित होते .









