३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुपवाड / प्रतिनिधी
मिरजेहुन पंढरपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत मरुधर ढाब्याच्या आडोशाला मोकळ्या जागेत खुलेआम सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कुपवाड पोलिसांनी जुगार अड्डाच उध्वस्त केला. या कारवाईत ७ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कमेसह मोबाईल व तीन ॲटो रिक्षा मिळून ३ लाख ३२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला. काल, रविवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.
अटक केलेल्यांमध्ये संशयित याकुब जहॉगीर बागवान (वय-४०), मन्सूर गुलाबहुसेन झारी (३२), इकबाल महमंद कोल्हापूरे (४०), शादाब सनाउल्ला कोल्हापूरे (२३), अजिमखान शम्मेखान पठाण ( ३५), हाफीज मुसा शेख (४१), यासिन नूरमहमंद कोल्हापूरे (३१,सर्व रा.ईदगाहनगर, मिरज) यांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








