कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमध्ये खेळत असताना अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीररित्या भाजून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
यामध्ये मास्टरअब्दुल मतीन अख्तरअली आय्यादखान (वय ६ वर्षे,रा. दत्तनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. अंगावर गरम पाणी पडल्याने बालक ७५ टक्के भाजले होते. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकाचे वडील आय्यादखान यांच्या पत्नीने बुधवारी रात्री गरम पाणी केले होते. त्याचा मुलगा मास्टरअब्दुल खेळत असताना गरम पाणी त्याच्या अंगावर पडल्याने ७५ टक्के भाजला होता. उपचारासाठी नातेवाईकांनी बालकाला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे बालकाचा मृत्यू झाला.








