आयुक्त व महापौरांनी केली जागेची पाहणी
प्रतिनिधी / कुपवाड
जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्यमातून कुपवाड शहरातील तीन ठिकाणी लवकरच बागबगीचा विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनामार्फ़त जागेची पाहणी करण्यात आली.
प्रभाग आठमधील विद्यानगर वारणाली गल्ली क्रमांक एकमधील ओपनस्पेस तसेच उल्हासनगर मधील महावीर व्यायाम मंडळालगतचा ओपनस्पेस आणि प्रभाग एकमधील बुधगाव रोड एकता कॉलनी येथील ओपनस्पेस आदी तीनठिकाणी नव्याने बगीचा विकसित करण्यात येणार आहेत. लवकरच या कामाला सुरूवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, पुणे येथील आर्किटेक्ट वनिता नाईक, शहरअभियंता संजय देसाई, नगरसेवक विष्णू माने. उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, शाखा अभियंता अल्ताफ मकानदार, अशोक कुंभार यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जागेची पाहणी केली. तिन्ही ठिकाणी अद्यावत गार्डन विकसित करण्यासाठी प्लॅन तयार करुन अंतिम मंजूरीला पाठवण्यासाठी नियोजन करण्यात आले.








