तरुणाला घरात घुसुन बेदम मारहाण : सहा जणांना अटक
प्रतिनिधी / कुपवाड
कुपवाडमध्ये काही महिन्यापासून एका ‘पैलवान गँग’ने चांगलीच दहशत माजवली आहे. शुक्रवारी सकाळी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सहाजणांच्या टोळीने एका तरुणाच्या घरात घुसुन त्याला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दगड व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या हल्ल्यात आशपाक खलील नदाफ (वय २१, रा.शांतकॉलनी, कुपवाड) हा जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीनुसार कुपवाड पोलिसांनी सहाजणांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. यामध्ये संशयित सागर मछिन्द्र व्हनकंडे (वय २७, रा. बामनोली), अक्षय सिद्धेश्वर थोरात (वय २४, रा. अवधूत कॉलनी, कुपवाड), अमोल आण्णासो निकम (वय २४, रा. धनगरगल्ली, कुपवाड), दिग्वीजय सुभाष चिंचकर (२५) व त्याचा सक्खा भाऊ दिनेश सुभाष चिंचकर (वय २४, रा. बामनोली) व सागर एकनाथ शेंडगे (वय ३५, रा. बामनोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.








