दिघंची/वार्ताहर
पुजारवाडी(दि) येथील पंतांचे तळ शेताजवळील कुटे वस्ती पाझर तलाव धोकादायक स्थितीत असून मुसळधार पाऊसाने तलावाला गळती लागली आहे. या पाझर तलावाची पुजारवाडी (दि) चे ब्रह्मदेव होनमाने व बाळासाहेब होनराव यांनी पाहणी करून दूरुस्तीची मागणी केली आहे.
दिघंचीचे ज्येष्ठ दिवंगत नेते काई गंगाधर पंत होनराव यांच्या पुढाकाराने 1972 च्या दुष्काळात सदर पाझर तलावाचे काम रोजगार हमी योजनेतून झाले होते. या तलावास तत्कालीन विधानसभेचे सभापती व रोजगार हमी चे जनक वी. स.पागे यांनी देखील भेट दिली होती. सदर पाझर तलावामुळे या भागातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आली आहे.
हा पाझर तलाव आता धोकादायक स्थितीत असून जर दुर्दैवाने हे फुटले तर शेकडो एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळीच शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ब्रह्मदेव व बाळासाहेब होनराव यांनी केली आहे.
Previous Articleपाशवी बहुमताच्या जोरावर आता बळी गाडला जाणार नाही – शेट्टी
Next Article अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक








