वार्ताहर / बोरगाव
कोरोना नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत असून कुटुंब प्रमुखाने आपल्या घरातील सर्व सदस्यांची विना तक्रार आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आव्हान सरपंच जयंती पाटील व उपसरपंच सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.
बोरगाव ता. वाळवा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोव्हीड-१९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी व कोरोना मुक्त महाराष्ट्र योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक या कोव्हीड योध्यानी गावातील प्रत्येक वार्ड, वाडी वस्ती या ठिकाणी जाऊन प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच लोकप्रतिनिधी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स व स्वयंसेवक यांनी या मोहिमेसाठी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








