कुपवाड / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरुन जाब विचारत पाच जणांनी कुपवाडमध्ये हनुमाननगर भागात राहणाऱ्या निलेश नाथाजी चव्हाण या तरूणास दगड, चप्पल व काठीने बेदम मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी रेकॉर्डवरील पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये संशयित सुरज रमेश काळे (रा.बुधगाव रोड), विनायक रामा पाटील (रा.कापसे प्लॉट), राजू अब्दुल शेख (रा.रामकृष्णनगर), आकाश उर्फ लोकेश लक्ष्मण जाधव (रा.हमालवाडी) व नितीन कल्लाप्पा कोष्टी (रा.कुपवाड) यांचा समावेश आहे. या पाच जणांनी ‘तु पोरांच्यात आमचे नाव बदनाम का करतोस? असे म्हणून मारहाण केल्याची फिर्याद जखमी निलेश चव्हाण याने दिली आहे.
Previous Articleभाजपला खिंडार; बड्या नेत्याकडून काँगेस प्रवेशाची घोषणा
Next Article लग्नाच्या अमिषाने फसवणूक; बंटी-बबलीला अटक








