प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील कार्वेचे तलाठी सुभाष यादव ( ५३, रा. नागेवाडी) यांचे शुक्रवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर सांगलीत उपचार सुरु होते. खानापूर तालुक्यात यापूर्वी भेंडवडे येथील तलाठी संजय पाटोळे यांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रशासनाला हा दुसरा धक्का बसला आहे. महसुली कामाचा अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे यादव आण्णा प्रशासन तसेच तालुक्यात परिचित होते. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेपाचशेवर जाऊन पोचला आहे.
दररोज तालुक्यात ५० ते ६० कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी जीवाची बाजी लावून विरोधातील युद्धात सहभागी झाले आहेत. याच लढाईत काही कोव्हीड योद्धांचा बळी गेल्याचे दिसून येते. सुमारे महिनाभरापूर्वी भेंडवडे येथील संजय पाटोळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कार्वे गावचे तलाठी सुभाष यादव यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.
तलाठी सुभाष यादव यांचे मुळगाव नागेवाडी. सध्या ते विट्यात वास्तव्यास होते. दहा दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर ओमश्री हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मिरजेतील भारती हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुभाष यादव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सध्या ते कार्वे येथे सेवा बजावत होते. महसुली कामाचा अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे यादव आण्णा प्रशासन तसेच तालुक्यात परिचित होते. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना रुग्णांना सुविधा द्या
Next Article मिरज कोविड रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोना








